रत्नागिरीत ७९, तर सिंधुदुर्गात ३७ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधित आढळण्याच्या प्रमाणात गेले काही दिवस घट झाली होती; मात्र त्यात आज पुन्हा वाढ झाली आहे. नव्या ७९ रुग्णांची नोंद आज (१४ ऑक्टोबर) झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ८१४४ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ३७ रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ४४७२ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (१४ ऑक्टोबर) ५९ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७२७४ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ८९.३१ टक्के आहे.

जिल्ह्यात आज नवे ७९ रुग्ण आढळले. त्यापैकी २७ आरटीपीसीआर चाचणीनुसार, तर ५२ जण रॅपिड अँटिजेन टेस्टनंतर करोनाबाधित असल्याचे नक्की झाले. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – मंडणगड १, खेड ५, गुहागर १, चिपळूण ७, संगमेश्वर ६, रत्नागिरी ७ (एकूण २७) रॅपिड अँटिजेन टेस्ट – दापोली २, चिपळूण २०, रत्नागिरी ४, लांजा २६ (एकूण ५२)

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८१४४ झाली आहे. बाधितांचा दर १५.५९ टक्के आहे. सध्या ४२२ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दोन्ही मृत्यू सरकारी रुग्णालयातील आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ७४ वर्षीय महिलेचा मृत्यू १४ ऑक्टोबर रोजी, तर संगमेश्वर तालुक्यातील ६९ वर्षीय महिलेचा मृत्यू १३ ऑक्टोबर रोजी झाला होता. त्यांची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता २९८ झाली असून जिल्ह्याचा मृत्यूदर ३.६५ टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८०, खेड ४९, गुहागर ११, दापोली ३२, चिपळूण ७१, संगमेश्वर ३१, लांजा १०, राजापूर १२, मंडणगड २.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१४ ऑक्टोबर) आणखी ३७ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४४७२ झाली आहे. आज ११२ जण करोनामुक्त झाले असून, आतापर्यंत ३६८३ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ११५ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या : देवगड ८, दोडामार्ग २, कणकवली २९, कुडाळ २०, मालवण ११, सावंतवाडी २८, वैभववाडी ७, वेंगुर्ला ९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १

Fest Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply