रत्नागिरीत २९, तर सिंधुदुर्गात ३१ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२१ ऑक्टोबर) २९ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८२७१ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ३१ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४६४० झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (२१ ऑक्टोबर) १५ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७६२४ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९२.१७ टक्के आहे.

जिल्ह्यात आज नवे २९ रुग्ण आढळले आहेत. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – मंडणगड ८, गुहागर ४, चिपळूण २ (एकूण १४). रॅपिड अँटिजेन टेस्ट – मंडणगड ९, दापोली २, चिपळूण २, लांजा २ (एकूण १५) (दोन्ही मिळून २९)

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८२७१ झाली आहे. बाधितांचा दर १५.११ टक्के आहे. सध्या २३४ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाच्या मृत्यूंची नोंद झाली असून, तो मृत्यू खासगी रुग्णालयात झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील ८२ वर्षीय पुरुष व्यक्तीचा त्यात समावेश आहे. मृतांची एकूण संख्या आता ३०९ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.७३ टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८३, खेड ४९, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७३, संगमेश्वर ३२, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२१ ऑक्टोबर) ३१ व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४६४० झाली आहे. आज ४२ जण करोनामुक्त झाले. आतापर्यंत ३९९५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२१ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या : देवगड ८, दोडामार्ग २, कणकवली ३०, कुडाळ २१, मालवण १३, सावंतवाडी ३०, वैभववाडी ७, वेंगुर्ला ९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply