रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी १२ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३० ऑक्टोबर) १२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८४४२ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज १२ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४८८० झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (३० ऑक्टोबर) २२ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७८४९ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९२.९७ टक्के आहे.

जिल्ह्यात आज नवे १२ रुग्ण आढळले आहेत. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – चिपळूण १, खेड १, रत्नागिरी १ (एकूण ३). रॅपिड अँटिजेन टेस्ट – दापोली १, गुहागर २, संगमेश्वर २, रत्नागिरी ३, लांजा १ (एकूण ९) (दोन्ही मिळून १२)

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८४४२ झाली आहे. बाधितांचा दर १५.५९ टक्के आहे. सध्या १६८ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आतापर्यंत ३१६ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.७४ टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८७, खेड ५०, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७४, संगमेश्वर ३३, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (३० ऑक्टोबर) १२ व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४८८० झाली आहे. आज १९ जण करोनामुक्त झाले असून, आतापर्यंत ४२४२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२६ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply