सिंधुदुर्गात एकाच दिवशी १९४ जण करोनामुक्त; रत्नागिरीत १७ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (११ नोव्हेंबर) १७ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८५५५ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज तीन नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ५०१९ झाली आहे. सिंधुदुर्गात आज एकाच दिवशी १९४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (११ नोव्हेंबर) ११ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८०७३ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.३६ टक्के आहे.

जिल्ह्यात आज नवे १७ रुग्ण आढळले आहेत. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – मंडणगड २, दापोली १, चिपळूण १, रत्नागिरी ३ (एकूण ७). रॅपिड अँटिजेन टेस्ट – दापोली ३, खेड २, संगमेश्वर २, रत्नागिरी ३ (एकूण १०) (दोन्ही मिळून १७)

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८५५५ झाली आहे. बाधितांचा दर १४.७४ टक्के आहे. सध्या ७४ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील ३१८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.७१ टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८७, खेड ५१, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७५, संगमेश्वर ३३, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (११ नोव्हेंबर) तीन व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ५०१९ झाली आहे. आज विक्रमी १९४ जण एकाच दिवशी करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण ४७४५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२८ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply