बासरीच्या सुरांवर जलरंगांचे कॅनव्हासवर नृत्य

मुंबई : कोकण कट्टा या सेवाभावी संस्थेने २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी मुंबईत जलरंगातील निसर्गचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते. विलेपार्ले पूर्व येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचा रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कोकणातील गुहागर, अलिबाग रेवदंडा परिसरातील निसर्ग या चित्रांमधून मुंबईकरांना अनुभवायला मिळाला.

या वेळी प्रहर महाकाळ यांच्या बासरीवादनाच्या पार्श्वभूमीवर चित्रकार किरण गुंजकर यांनी जलरंगांतलं एक सुंदर चित्र साकारलं. बासरीच्या सुरांवर जलरंगांनी जणू कॅनव्हासवर केलेल्या नृत्याच्या अनोख्या आविष्काराचे साक्षीदारही उपस्थित रसिकांना होता आले. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

कूपर रुग्णालयाचे सहायक अधिकारी किशोर बिसुरे, माजी आमदार गुरुनाथ देसाई, माजी नगरसेवक मनमोहन चोणकर, रत्नागिरीचे माजी सभापती दत्ता कदम, पार्ले येथील स्वामी समर्थ मठाचे विश्वस्त विनय कंटक, उद्योजक संतोष जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाला सुरुवात झाली.

पार्ले येथील अनेक नामवंत व्यक्तींनी प्रदर्शन पाहिले आणि कलावंतांचे कौतुक केले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी कोकण कट्टा संस्थेचे संस्थापक अजित पितळे यांच्यासह तुषार कदम, आशुतोष जाधव, मंगेश राणे, सुनील चव्हाण, शिरीष दळवी, दशरथ पांचाळ, रोहित कोरकर, हर्षल धराधर यांनी परिश्रम घेतले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply