जनशताब्दी एक्स्प्रेस दररोज धावणार

रत्नागिरी : दादर ते मडगाव आणि परत या मार्गावर धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस गाडी (क्र. 01151/01152) आता दररोज धावणार आहे.

करोनाच्या काळात ही गाडी बंद होती. गेल्या १० फेब्रुवारीपासून सध्या ती सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार असे पाच दिवस धावत आहे. ही गाडी उद्यापासून (२ मार्च) दररोज धावणार आहे. तिच्या वेळापत्रकात आणि स्थानकांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

गाडी दररोज सकाळी पाच वाजून २५ मिनिटांनी दादरहून सुटेल आणि दुपारी २ वाजू १० मिनिटांनी मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ती दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि रात्री सव्वाअकरा वाजता दादरला पोहोचेल. गाडी ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि थिवी येथे थांबेल.

गाडीला एसी चेअरकार २, द्वितीय श्रेणी आसनांचे १०, व्हिस्टा डोम १ आणि एसएलआर बैठकीचे २ डबे असे एकूण १५ डबे असतील, असे कोकण रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply