रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१ मार्च) करोनाचे नवे १७ रुग्ण आढळले, तर १६ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे ५ बाधित आढळले, तर एकही रुग्ण बरे झाल्याने घरी गेला नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे १७ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत १० आणि चिपळूणमध्ये ५, तर रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी १ (एकूण २) रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून १७). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९९९१ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी १५० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ८० हजार ७४५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १३८ आहे. त्यातील सर्वाधिक ५१ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ४७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
जिल्ह्यात आज १६ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९४६१ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.७० टक्के आहे.
जिल्ह्यात आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३६५ असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६५ टक्के आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती
सिंधुदुर्गात आज (१ मार्च) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे ५ करोनाबाधित आढळले, तर आज एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६४४७ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६११४ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७३ आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करून कालच्या दिवसभरात २४४ व्यक्तींकडून दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये पोलिसांनी २०७ व्यक्तींवर कारवाई करून ५८ हजार ८०० रुपयांचा, तर नगरपालिका क्षेत्रात ३७ व्यक्तींकडून ९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एकूण ६८ हजार ६०० रुपयांचा हा दंड आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाकडून एकूण ७० ठिकाणांची तपासणी करण्यात आली. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी करोनाच्या प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, तसेच मास्क, हॅण्डसॅनिटायझरचा वापर करा आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media

