झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय नववा – भाग ७

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय नववा : राजगुह्य

सारें काही मी तें । घेतों आवडीनें ।।
प्रेमातुर मनें । पार्थराया!।।२५।।

जें जें तूं म्हणूनी । खाशी देशी घेशी ।।
अर्पी तें मजसी । भक्तिभावें ।।२६।।

शत्रु मित्र भेद । नाही मजपाशीं ।।
एक मी सर्वांशी । अग्नि जसा ।।२७।।

जे पूजीती । माझे ते असती ।।
त्यांचा मी निश्‍चितीं। असें तैसा ।।२८।।

Chapter 9 – The Divine Secret

All that I take । Lovingly intake ।
Simply for the sake । Of passionate love ।।25।।

Whatever you bake । Eat, give and take ।
Devotionally make । Submission to me ।।26।।

As, all equal before । The flames of fire ।
I do not differ । Friend and foe ।।27।।

Tose worship me । Those belong to me ।
Oh, prince trust me । I am their ।।28।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

……..

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथ नवमोऽध्यायः । राजविद्याराजगुह्ययोगः

श्रीभगवानुवाच ।

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ ९-२७॥

शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः ।
संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥ ९-२८॥

समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ।
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥ ९-२९॥

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply