रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या दहा हजाराच्या वर

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२ मार्च) करोनाचे नवे १३ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा हजारावर गेली आहे. आज १६ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे ७ बाधित आढळले, तर १० जण बरे झाल्याने घरी गेले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे १३ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत ४, चिपळूणमध्ये १ आणि संगमेश्वरमध्ये ५ रुग्ण आढळले. रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी, खेड आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी १ (एकूण ३) रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून १३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार ४ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ३७२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ८१ हजार ११७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १३६ आहे. त्यातील सर्वाधिक ४६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ५१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १७ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९४७८ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.७४ टक्के आहे.

जिल्ह्यात आज दोघा पुरुष रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. चिपळूणमधील ६२ वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू गेल्या २४ फेब्रुवारीला झाला होता. त्याची नोंद आज झाली, तर आज रत्नागिरीत ७० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३६७ असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६७ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (२ मार्च) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे ७ करोनाबाधित आढळले, तर १० रुग्ण करोनामुक्त झाले. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६४५४ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६१२४ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७३ आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर काल दिवसभरात १६३ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. महसूल विभागाने २ व्यक्तींवर कारवाई करून एक हजाराचा, तर पोलिसांनी १०४ व्यक्तींवर कारवाई करून ४४ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. नगरपालिका क्षेत्रातील ५६ व्यक्ती विनामास्क आढळून आल्याने त्यांच्याकडून १५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एका व्यक्तीवर मास्क न वापरल्याने कारवाई करून २०० रुपये वसूल करण्यात आले. दिवसभरात वसूल करण्यात आलेल्या एकूण दंडाची रक्कम ६१ हजार ६०० रुपये आहे. याशिवाय जिल्ह्यातील महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाकडून १२४ ठिकाणांची तपासणी करण्यात आली. त्यात ४ ठिकाणी करोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply