सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे ९७ रुग्ण, २१ जण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (९ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार करोनाची बाधा झालेले नवे ९७ रुग्ण आढळले, तर २१ जणांनी करोनावर मात करून ते सुखरूप घरी पोहोचले आहेत.

आजच्या ९७ रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता ७ हजार ८४६ झाली आहे. या रुग्णांचा आजपर्यंतचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ७०३, दोडामार्ग – ३९९, कणकवली – २२७९, कुडाळ – १६९१, मालवण – ७७०, सावंतवाडी – १०२९, वैभववाडी – २८७, वेंगुर्ले ६४३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ४५.

आज २१ जण करोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची संख्या ६ हजार ७३३ झाली आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण देवगड तालुक्यात

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्याही वाढू लागली असून आज ती ७९२ झाली आहे. सर्वाधिक १८४ सक्रिय रुग्ण देवगड तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – दोडामार्ग २६, कणकवली १६८, कुडाळ १६५, मालवण ११६, सावंतवाडी १०१, वैभववाडी ७५, वेंगुर्ले ६६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १३.

आज नव्या मृत्यूची नोंद झाली नाही. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १९३ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

ई-संजीवनी कार्यक्रम

जिल्ह्यातील जनतेला घरीच सुरक्षित राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचारांवर सल्लामसलत करण्यात यावी, यासाठी ई-संजीवनी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेचा आतापर्यंत ९५ जणांनी लाभ घेतला आहे. नागरिकांनी ई-संजीवनी ओपीडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply