रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या रुग्णांची वाढ सुरूच आहे. आज (९ एप्रिल) नवे विक्रमी २५१ रुग्ण आढळले, तर विक्रमी १७५ रुग्ण करोनामुक्त झाले. एकाचा मृत्यू झाला.
आज जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बाधित रुग्ण आढळले. सर्वाधिक ७४ रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ५१, खेड आणि राजापूर प्रत्येकी १३, गुहागर आणि लांजा प्रत्येकी ९, चिपळूण ३७, संगमेश्वर १७ आणि मंडणगड १.(एकूण १५०). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी २३, दापोली १९, खेड १२, गुहागर १०, चिपळूण ८, संगमेश्वर २४, मंडणगड आणि राजापूर प्रत्येकी १, लांजा ३. (एकूण १०१) (दोन्ही मिळून २५१). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १२ हजार २७१ झाली आहे.
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ८५४ आहे. त्यातील सर्वाधिक १४५ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ३७९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १७५ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या दहा हजार ७५० झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज पुन्हा कमी झाला असून तो ८७.६० टक्के झाला आहे.
आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ९२८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत एक लाख पाच हजार ४९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील ८५ वर्षीय रुग्णाचा शासकीय रुग्णालयात काल मृत्यू झाल्याची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ३८९ असून मृत्युदर ३.१७ टक्के झाला आहे.
Follow Kokan Media on Social Media

