सिंधुदुर्गात नवे २९३ करोनाबाधित, २३५ करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२४ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार करोनाची बाधा झालेले नवे २९३ रुग्ण आढळले, तर २३५ जण करोनामुक्त झाले. आज ६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

आजच्या २९३ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता ११ हजार १८७ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ३१, दोडामार्ग – १९, कणकवली – ६५, कुडाळ – ५५, मालवण – ३२, सावंतवाडी – ४६, वैभववाडी – ८, वेंगुर्ले ३४. जिल्ह्याबाहेरील ३.

आज २३५ जण करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८ हजार ३४ झाली आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची आजची संख्या दोन हजार ८८४ आहे. सर्वाधिक ५८४ सक्रिय रुग्ण कणकवली तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ३७८, दोडामार्ग १४७, कुडाळ ४७७, मालवण ३७९, सावंतवाडी ३४१, वैभववाडी ३३९, वेंगुर्ले १९४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ४५. सक्रिय रुग्णांपैकी १४२ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी १२५ रुग्ण ऑक्सिजनवर तर १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज ६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. करोनामुळे मरण पावलेल्या या बाधिताचा पत्ता, लिंग, वय, कारण आणि मृत्यूचे ठिकाण या क्रमाने मृतांचा तपशील असा – १) मु. पो. जामसंडे, ता. देवगड, महिला, ६५, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. २) मु. पो. कांबळेगल्ली, ता. कणकवली, पुरुष, ६५, मधुमेह, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ३) मु. पो. कुंब्रल, ता. दोडामार्ग, पुरुष, ५८, उच्च रक्तदाब, मधुमेह, जिल्हा रुग्णालय. ४) मु. पो. देवली, ता. मालवण, महिला, ७०, उच्च रक्तदाब, मधुमेह, जिल्हा रुग्णालय. ५) मु. पो. नावळे, ता. वैभववाडी, पुरुष, ५०, उच्च रक्तदाब, मधुमेह, जिल्हा रुग्णालय. ६) मु. पो. मालवण, ६०, मधुमेह, उच्च रक्तदाब, एसएसपीएम, पडवे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply