रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ५३६ रुग्ण, २१७ करोनामुक्त, २३ जणांचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२४ एप्रिल) नवे ५६३ रुग्ण आढळले. आज २१७ जण करोनामुक्त झाले, तर २३ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. आज २१७ रुग्ण करोनामुक्त झाले.

जिल्ह्यात आज प्रत्येक तालुक्यात रुग्ण सापडले. सर्वाधिक १६५ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात सापडले.

जिल्ह्यात सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ११४, दापोली २८, गुहागर १९, चिपळूण ५६, संगमेश्वर ३७, मंडणगड ५, लांजा ११, राजापूर ८. (एकूण २९८). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ५१, दापोली २०, खेड ९, गुहागर ८४, चिपळूण ६४, संगमेश्वर २८, राजापूर ९. (एकूण २६५). (दोन्ही मिळून ५३३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १८ हजार ६०९ झाली आहे.

जिल्ह्यात आज २१७ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या १३ हजार ३९ झाली आहे. करोनामुक्तीचा दर कमी झाला असून तो ७०.०६ टक्के झाला आहे.

आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी एक हजार ११३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत एकूण एक लाख १९ हजार ९४७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आज पूर्वीचे ६ आणि आजचे १७ अशा एकूण २३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ५५२ झाली असून मृत्युदर २.९६ टक्के आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय एकूण मृत्यू असे – रत्नागिरी १३७, खेड ७८, गुहागर २३, दापोली ५७, चिपळूण ११७, संगमेश्वर ८२, लांजा २२, राजापूर ३०, मंडणगड ६.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply