सिंधुदुर्गात ३८४ रुग्ण करोनामुक्त, १३ रुग्णांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२६ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार ३८४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. नवे १९७ रुग्ण आढळले, तर १३ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.

आज एकाच दिवशी ३८४ जण करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८ हजार ४४३ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ६, दोडामार्ग – २, कणकवली – २६, कुडाळ – ५८, मालवण – ४५, सावंतवाडी – ३४, वैभववाडी – ११, वेंगुर्ले १२, जिल्ह्याबाहेरील ३.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची आजची संख्या दोन हजार ८९४ आहे. सर्वाधिक ६०८ सक्रिय रुग्ण कणकवली तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ३८०, दोडामार्ग १२४, कुडाळ ३९१, मालवण ४१०, सावंतवाडी ३५१, वैभववाडी ३९७, वेंगुर्ले १८२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ५१. सक्रिय रुग्णांपैकी १८६ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी १५७ रुग्ण ऑक्सिजनवर तर २९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २८० झाली आहे.

करोनामुळे आज मरण पावलेल्या बाधितांचा पत्ता, लिंग, वय, कारण आणि मृत्यूचे ठिकाण या क्रमाने मृतांचा तपशील असा – १) मु. पो. इन्सुली, ता. सावंतवाडी, महिला, ५३, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. २) मु. पो. उंबर्डे, ता. वैभववाडी, महिला, ७९, मधुमेह, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ३) मु. पो. भरड, ता. मालवण, पुरुष, ५९, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ४) मु. पो. कुणकवणे, ता. देवगड, पुरुष, ६५, मधुमेह, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ५) मु. पो. चौके, ता. मालवण, पुरुष, ७०, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ६) मु. पो. मेंढा, ता. मालवण, पुरुष, ६०, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ७) मु. पो. नाधवडे, ता. वैभववाडी, महिला, ५५, मधुमेह, जिल्हा रुग्णालय. ८) मु. पो. वराड, ता. मालवण, पुरुष, ६२, मधुमेह, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ९) मु. पो. गाडीअड्डा, ता. वेंगुर्ले, महिला, ६२, मधुमेह, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. १०) मु. पो. वैभववाडी, ता. वैभववाडी, पुरुष, ६८, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. ११) मु. पो. मालवण, ता. मालवण, पुरुष, ६५, उच्च रक्तदाब, जिल्हा रुग्णालय. १२) मु. पो. पडवे, ता. कुडाळ, महिला, ६१, मधुमेह, उच्च रक्तदाब, एसएसपीएम, पडवे. १३) मु. पो. उभादांडा, ता. वेंगुर्ले, पुरुष, ५५,
उच्च रक्तदाब, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply