सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे २६३ करोनाबाधित रुग्ण, १८८ जण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (३ मे) दुपारी १२ वाजेपर्यंत पुन्हा तपासणी केलेल्या दोघांसह २६३ करोनाबाधित रुग्ण आढळले. आज १८८ रुग्ण करोनामुक्त झाले. सद्यःस्थितीत जिल्ह्यात दोन हजार ९३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या २६३ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता १३ हजार ७१८ झाली आहे. आजच्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ३०, दोडामार्ग – ४३, कणकवली – ३७, कुडाळ – १३, मालवण – २०, सावंतवाडी – ६१, वैभववाडी – १६, वेंगुर्ले ३८, जिल्ह्याबाहेरील ३.

जिल्ह्यात सर्वाधिक ५५५ सक्रिय रुग्ण कुडाळ तालुक्यात, तर त्याखालोखाल कणकवली तालुक्यात ५१५ रुग्ण आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ३४७, दोडामार्ग १८४, मालवण ४५०, सावंतवाडी ३३९, वैभववाडी २०५, वेंगुर्ले २८५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ५८. सक्रिय रुग्णांपैकी ३१५ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी २७५ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३५८ झाली आहे. आज सर्वाधिक ४ मृत्यू देवगड तालुक्यात झाले. कुडाळ आणि मालवण तालुक्यात प्रत्येकी २, तर दोडामार्ग, कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील तालुकानिहाय मृत्यूची आजपर्यंतची एकूण संख्या अशी – देवगड ३९, दोडामार्ग – १०, कणकवली – ८६, कुडाळ – ५७, मालवण – ४५, सावंतवाडी – ६१, वैभववाडी – ३५, वेंगुर्ले – २३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.

जिल्हा रुग्णालयात स्फोट नाही
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात आज पहाटे झालेला आवाज स्फोटाचा नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे.

जिल्हा रुग्णालयात खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत १०० खाटांची आंतररुग्ण कक्षाची इमारत असून तेथे कोविड हॉस्पिटल (डीसीएच) कार्यरत आहे. इमारतीकरिता मध्यवर्ती ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा कर्यान्वित केलेली आहे. यंत्रणेला जंबो ऑक्सिजन सिलिंडर जोडलेले असताना आज, ३ मे रोजी पहाटे २.३० च्या दरम्यान त्यामधील २ सिलिंडर्स कनेक्टर आतील वायूच्या उच्च दाबामुळे निसटून, भरलेल्या सिलिंडर्समधील वायू वेगाने बाहेर आल्याने तेथे मोठा आवाज आला. त्या ठिकाणी स्फोट, आग तसेच जीवितहानी किंवा वित्तीय हानी झालेली नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी कळविली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply