रत्नागिरीत नवे ३२४ करोनाबाधित रुग्ण, ३८६ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३ मे) नवे ३२४ करोनाबाधित आढळले, तर ३८६ जण करोनामुक्त झाले.

जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणीनुसार १९९, तर रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार १२४ असे एकूण ३२४ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता २३ हजार ६२६ झाली आहे. आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून सहा हजार ५३७ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत.

जिल्ह्यात आज ३८६ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या १६ हजार ३९१ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ६९.३७ टक्के आहे.

जिल्ह्यात आज पूर्वीचे २ आणि आजचे १५ अशा एकूण १७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ६९८ झाली असून मृत्युदर २.९५ टक्के आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply