रत्नागिरी जिल्ह्यात नवे ५९६ करोनाबाधित, ५२१ जण घरी परतले

रत्नागिरी : जिल्ह्यात आज (४ मे) नवे ५९६ करोनाबाधित आढळले, तर ५२१ जण करोनामुक्त झाले. आज १७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणीनुसार २७७, तर रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार ५९६ असे एकूण ५९६ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता २४ हजार २२२ झाली आहे. आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून सहा हजार ५९५ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी ५९२ जणांची चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३१ हजार ४०८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ५२१ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या १६ हजार ९१२ झाली आहे. करोनामुक्तांची ही टक्केवारी ६९.८२ टक्के आहे.

जिल्ह्यात आज पूर्वीचे १० आणि आजचे ७ अशा एकूण १७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ७१५ झाली असून मृत्युदर २.९५ टक्के आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply