सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, रुग्ण, नवे ५७३ रुग्ण

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (४ मे) नव्या करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ नोंदविली गेली. दुपारी १२ वाजेपर्यंत पुन्हा तपासणी केलेल्या चौघांसह ५७३ करोनाबाधित रुग्ण आढळले. आज १०७ रुग्ण करोनामुक्त झाले.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात तीन हजार ३९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या ५७३ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता १४ हजार २९१ झाली आहे. आजच्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ९८, दोडामार्ग – ५२, कणकवली – ८३, कुडाळ – ११५, मालवण – ९५, सावंतवाडी – ८९, वैभववाडी – ९, वेंगुर्ले २७, जिल्ह्याबाहेरील ५.

जिल्ह्यात सर्वाधिक ६४५ सक्रिय रुग्ण कुडाळ तालुक्यात, तर त्याखालोखाल कणकवली तालुक्यात ५९० रुग्ण आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ४४१, दोडामार्ग २२९, मालवण ५३४, सावंतवाडी ३८०, वैभववाडी २०६, वेंगुर्ले ३०८, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ६३. सक्रिय रुग्णांपैकी ३२१ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी २८२ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३६६ झाली आहे. आज देवगड आणि मालवण तालुक्यात प्रत्येकी २, तर कणकवली, सावंतवाडी, वैभववाडी आणि वेंगुर्ले तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील तालुकानिहाय मृत्यूची आजपर्यंतची एकूण संख्या अशी – देवगड ४१, दोडामार्ग – १०, कणकवली – ८७, कुडाळ – ५७, मालवण – ४७, सावंतवाडी – ६२, वैभववाडी – ३६, वेंगुर्ले – २४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply