ठाणे : कोकण इतिहास परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि लेखक सदाशिव टेटविलकर यांची निवड झाली आहे.
गेल्या जानेवारी महिन्यात परिषदेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांचे निधन झाले. त्यामुळे अध्यक्षपद रिक्त होते. ते भरण्यासाठी आभासी पद्धतीने झालेल्या सभेत कोकण इतिहास परिषदेच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली.
नूतन अध्यक्ष सदाशिव टेटविलकर इतिहास संशोधन आणि लेखन करीत आहेत. दुर्गयात्री, दुर्गसंपदा ठाण्याची, विखुरल्या इतिहास खुणा, तुमचे-आमचे ठाणे, महाराष्ट्रातील वीरगळ, गावगाडा प्राचीन ते अर्वाचीन आदी त्यांची पुस्तके लोकप्रिय आहेत. परिषदेच्या उपाध्यक्षपदी रायगड जिल्ह्यातील रोहा येथील इतिहास अभ्यासक डॉ. श्रीनिवास वेदक यांची निवड झाली तर सचिव म्हणून प्रा.डॉ. विद्या प्रभू यांची निवड झाली आहे.
कोकणच्या इतिहासाला एक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या परिषदेची २०१० मध्ये स्थापना करण्यात आली. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दाऊद दळवी, त्यांच्यानंतर रवींद्र लाड आणि आता सदाशिव टेटविलकर हे तिसरे अध्यक्ष आहेत. परिषदेची आतापर्यंत १० वार्षिक अधिवेशने यशस्वीपणे झाली आहेत.
कोकण इतिहास संशोधन पत्रिकेच्या संपादक मंडळाचीही फेररचना करण्यात आली. संपादकपदी प्रा. भारती जोशी, सदस्य डॉ. विद्या गाडगीळ, प्रा. प्रेरणा राऊत, प्रा. विकास मेहेंदळे, रणजित हिर्लेकर, डॉ. अजय धनावडे, प्रा. रमीला गायकवाड आणि प्रवीण कदम यांची निवड करण्यात आली.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
