सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, २५ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत २१६, तर एकूण १७ हजार ४८१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात पाच हजार ११५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३६१ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
आज सापडलेल्या रुग्णांची संख्या ३६१ आहे. आजच्या नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता २३ हजार २२२ झाली आहे. आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ४७, दोडामार्ग – ३५, कणकवली – ४७, कुडाळ – ९३, मालवण – ५८, सावंतवाडी – ५८, वैभववाडी – ४, वेंगुर्ले – १७, जिल्ह्याबाहेरील २.
सध्या जिल्ह्यात ५ हजार ११५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६४८, दोडामार्ग ४२२, कणकवली ६५४, कुडाळ ९३४, मालवण ८७६, सावंतवाडी ८५९, वैभववाडी १५२, वेंगुर्ले ५४०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण ३०. सक्रिय रुग्णांपैकी ३६२ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी ३१४ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ६२० झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड १, मालवण ४, कणकवली १, सावंतवाडी ४, वेंगुर्ले १.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या तालुकानिहाय मृत्यूची एकूण संख्या अशी – देवगड ७६, दोडामार्ग – १८, कणकवली – १३०, कुडाळ – ९०, मालवण – ९७, सावंतवाडी – १०६, वैभववाडी – ४६, वेंगुर्ले – ५५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.
Follow Kokan Media on Social Media

