सिंधुदुर्गात नवे करोनाबाधित आणि मृतांच्या संख्येतही वाढ

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, ८ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ६७५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यात करोनाची स्थिती अजूनही धोकादायक अवस्थेत असल्याचे आज स्पष्ट झाले.

सध्या जिल्ह्यात ६ हजार ८८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज २० जणांच्या दुबार तपासणीसह ६७५ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ६४, दोडामार्ग – १०, कणकवली – ११५, कुडाळ – १८५, मालवण – ९४, सावंतवाडी – ८२, वैभववाडी – २७, वेंगुर्ले – ७५, जिल्ह्याबाहेरील ३.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १०८५, दोडामार्ग २९०, कणकवली १०४२, कुडाळ १३६३, मालवण १३४८, सावंतवाडी ९१३, वैभववाडी २६५, वेंगुर्ले ५५६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २७. सक्रिय रुग्णांपैकी ३७७ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात आधीच्या ११ आणि आजच्या ९ अशा २० जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ७८९ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड ३, दोडामार्ग १, कणकवली ६, कुडाळ २, मालवण २, सावंतवाडी १, वैभववाडी २, वेंगुर्ले २, जिल्ह्याबाहेरील १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १०८, दोडामार्ग – २५, कणकवली – १६३, कुडाळ – १२०, मालवण – १२९, सावंतवाडी – १२३, वैभववाडी – ५४, वेंगुर्ले – ६४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ३.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply