सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवबाधितांपेक्षा सहापट रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्या करोनाबाधितांच्या सहापटीहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले.

आज करोनाचे नवे १६० रुग्ण आढळले. आजपर्यंतच्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४५ हजार १६५ झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत ४० हजार ७२६ रुग्ण करोनामुक्त झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज, १३ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ९८१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज दुबार तपासणी केलेल्या एका रुग्णासह नवे १६० करोनाबाधित रुग्ण आढळले.

सध्या जिल्ह्यात ३ हजार २९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ३७, दोडामार्ग – ३, कणकवली – ३१, कुडाळ – २८, मालवण – २१, सावंतवाडी – १४, वैभववाडी – ५, वेंगुर्ले – २०, जिल्ह्याबाहेरील १.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ४९५, दोडामार्ग १०१, कणकवली ५८८, कुडाळ ७४२, मालवण ५५७, सावंतवाडी ४००, वैभववाडी १३२, वेंगुर्ले २६१, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २२. सक्रिय रुग्णांपैकी १८० रुग्ण ऑक्सिजनवर तर ४२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात ३ रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार १३९ झाली आहे. आज मृत्यू झालेल्या ३ आणि आज नोंद झालेल्या आधीच्या ४ मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – कुडाळ २, मालवण २, सावंतवाडी १, वेंगुर्ले २.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १५१, दोडामार्ग – ३४, कणकवली – २२८, कुडाळ – १७३, मालवण – २३७, सावंतवाडी – १५१, वैभववाडी – ६९, वेंगुर्ले – ८८, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply