रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१३ जुलै) सलग तिसऱ्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक आहे.
आज ५३० रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे करोनामुक्तांची टक्केवारी ९१.६७ झाली आहे.
आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर १०९, अँटिजेन चाचणी १८४ (एकूण २९३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६७ हजार १९ झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ७.६१ असून एकूण रुग्णवाढीचा दर १३.३० टक्के आहे.
आज तीन हजार ३७४ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात एक हजार ५२७ गृह विलगीकरणात, एक हजार ८४७ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी २८९ जणांची कोविन पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे.
आज तीन हजार ५५८ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ४३ हजार ७६३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात ५३० रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ६१ हजार ४३९ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९१.६७ टक्के झाली आहे.
जिल्ह्यात यापूर्वीच्या १० आणि आजच्या २ अशा १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ९१७ झाली आहे. मृत्युदर किंचित वाढून तो २.८६ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ६३४, खेड १७४, गुहागर १४२, दापोली १६७, चिपळूण ३६९, संगमेश्वर १७५, लांजा ९९, राजापूर ११६, मंडणगड २७. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १९१७).
………….

