रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२४ जुलै) करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या नवबाधितांपेक्षा अधिक आहे. आज नवे १९७ रुग्ण बरे झाले, तर १४० नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६५ हजार १२७ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९३.४५ झाली आहे.
आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – ४६, अँटिजेन – ९४ (एकूण १४०). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६९ हजार ६९४ झाली आहे.
आज दोन हजार ५९३ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ९१५, तर लक्षणे असलेले ६७८ रुग्ण आहेत. एक हजार १२४ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ७४६, डीसीएचसीमधील ३७५, तर डीसीएचमध्ये ३०३ रुग्ण उपचार घेत आहेत. बाधितांपैकी २२५ जण ऑक्सिजनवर, १०१ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज ८ रुग्णांचा मृत्यू झाला. आजचा मृत्युदर २.८५ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ९८८ झाली आहे.
आज आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या तीन हजार ९ नमुन्यांपैकी दोन हजार ९६३ अहवाल निगेटिव्ह, तर ४६ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या एक हजार ५६० पैकी एक हजार ४६६ अहवाल निगेटिव्ह, तर ९४ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ७१ हजार ९१० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – मंडणगड २९, दापोली १७६, खेड १७८, गुहागर १४७, चिपळूण ३८०, संगमेश्वर १७९, रत्नागिरी ६५८, लांजा १०४, राजापूर १२३, इतर जिल्ह्यातील १३. दुबार मोजणी १. (एकूण १९८८).
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
