सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१५ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार नव्या बाधितांच्या संख्येत आश्वासक घट झाली आहे.
आज ४५ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले. त्यांच्यासह आतापर्यंत ४६ हजार ६३१ रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यात २ हजार १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज ६७ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ४९ हजार ९४७ झाली आहे.
जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग ०, कणकवली २४, कुडाळ १७, मालवण ३, सावंतवाडी १६, वैभववाडी २, वेंगुर्ले ४. सक्रिय रुग्णांपैकी ८० रुग्ण ऑक्सिजनवर तर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड २८९, दोडामार्ग ४८, कणकवली ३४९, कुडाळ ५२७, मालवण २९०, सावंतवाडी ३०१, वैभववाडी ७३, वेंगुर्ले १३८, जिल्ह्याबाहेरील १३.
आज जिल्ह्यात वैभववाडी आणि कणकवली येथील प्रत्येकी एका रुग्णाच्या, तसेच आधीच्या २ अशा एकूण ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २९६ झाली आहे.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६४, दोडामार्ग – ३५, कणकवली – २७२, कुडाळ – २०१, मालवण – २६१, सावंतवाडी – १७९, वैभववाडी – ७५, वेंगुर्ले – १००, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
Follow Kokan Media on Social Media

