रत्नागिरी जिल्ह्यात १५६ नवबाधित, १६२ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१५ ऑगस्ट) १५६ नवे करोनाबाधित आढळले, तर १६२ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ७० हजार १५० झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९४.६० झाली आहे.

आज आढळलेल्या नव्या १५६ करोनाबाधित रुग्णांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या चार हजार ३९१ नमुन्यांपैकी चार हजार ३०२ अहवाल निगेटिव्ह, तर ८९ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या एक हजार ८२२ पैकी एक हजार ७५५ अहवाल निगेटिव्ह, तर ६७ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७४ हजार १५६ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ३५४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज एक हजार ६५८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ३२१, तर लक्षणे असलेले ३३७ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ८८९, तर ७६२ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात असून १४६ रुग्णांची पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४२५, डीसीएचसीमधील १३७, तर डीसीएचमध्ये २०० रुग्ण आहेत. बाधितांपैकी १३२ जण ऑक्सिजनवर, ७८ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

यापूर्वीच्या ३ आणि आजच्या ४ अशा एकूण ७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील ३.१५ हा मृत्युदर घटून तो २.९७ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या दोन हजार २०२ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या एक हजार ८४७ (८३.८८ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ७९४ (३६.०६ टक्के) आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३४, दापोली १९०, खेड १९१, गुहागर १५८, चिपळूण ४२५, संगमेश्वर १९३, रत्नागिरी ७४७, लांजा ११८, राजापूर १४६. (एकूण २२०२).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply