रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तांची टक्केवारी वाढती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २६ ऑगस्ट) जिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या दैनंदिन अहवालानुसार करोनामुक्तांची टक्केवारी वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज १४१ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७१ हजार ९८५ झाली असून ही टक्केवारी ९५.५८ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ९६ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २२५३ नमुन्यांपैकी २२१९ अहवाल निगेटिव्ह, तर ३४ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या १५६५ पैकी १५०३ अहवाल निगेटिव्ह, तर ६२ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७५ हजार ३१० झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ४३ हजार ४३७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ९८० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ६७१, तर लक्षणे असलेले ३०९ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४९७ आहे. संस्थात्मक विलगीकरणात ४८३ रुग्ण असून ७५ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले १७४, डीसीएचसीमधील १३५, तर डीसीएचमध्ये १७४ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १३६ जण ऑक्सिजनवर, ७० रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आधीच्या ३ आणि आजच्या १ अशा एकूण ४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ३.६६ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०१ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.४१ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २२७० झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या १९०३ (८३.८३ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ८०६ (३५.५१ टक्के) आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३४, दापोली १९७, खेड २०१, गुहागर १६१, चिपळूण ४४४, संगमेश्वर १९९, रत्नागिरी ७६६, लांजा ११९, राजापूर १४९. (एकूण २२७०).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply