नारळी पौर्णिमा, नारळ, खोबरे, दूध, तेल, करवंटी आणि बरेच काही…

आंबा हा फळांचा राजा असला तरी श्रीफळाचा दर्जा मात्र नारळालाच आहे. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात! नुकत्याच झालेल्या नारळी पौर्णिमेबाबत पारंपरिक माहिती अनेक ठिकाणी मिळेलच. पण नारळाच्या थोड्या शास्त्रीय गमतीदेखील जाणून घेऊ या!

…………………………………………………………………..

नारळी पौर्णिमा ही श्रावणातील पौर्णिमा. हा काळ नाविन्याचा. हा काळ सणासुदीची वर्णी देणारा. आणि सणासुदीचा काळ आनंदात जायला हवा असेल, तर कृपा हवी वरुणाची! म्हणून त्या दिवशी सर्वांत प्रथम वरुणराजाबद्दल  कृतज्ञता व्यक्त करून त्याला श्रीफळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी केली जाते.

हिंदू धर्मातील अशा अनेक प्रथा-परंपरा प्रतीकात्मक आहेत. काही उपचार सांगितले आहेत, पण त्याला शास्त्राची जोड आहे. विचार आहे. श्रावणी पौर्णिमेला जानवे बदलण्याचा मुख्य कार्यक्रम असतो. नवीन जानवे धारण केले जाते. तसेच काही लोक सुती पोवती/वस्त्रे देवांना अर्पण करून अंगावर धारण करतात. गुरुकुल परंपरेत विद्यार्थ्यांना शिकविण्याचा पहिला दिवस किंवा ज्याचे शिक्षण पूर्ण झाले आहे अशा विद्यार्थ्यांच्या समावर्तन संस्काराचा दिवस म्हणून श्रावण पौर्णिमा महत्त्वाची मानली जाते असे.

श्रावणात सृष्टी जशी सारी मरगळ झटकून नवी पालवी धारण करते आणि सारा आसङ्कंत विविधरंगी फुलांनी बहरून येतो, तसेच नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेला जागे करून काही नवे चालू करायचा उत्तम दिवस म्हणजे श्रावणी!

या नारळी पौर्णिमेची जोड देणार्‍या आपल्या पूर्वजांच्या कल्पनाशक्तीचे कौतुक वाटते. तसे तर प्रत्येक फळाच्या सालीपासून बियांपर्यंत विविध प्रकारचे फायदे आहेतच, काहीही वाया जात नाही.. तरी नारळ हेच श्रीफळ आहे. का बरे? खरे तर या विषयावर कितीतरी संशोधन झाले आहे. पण आवश्यक अशी माहिती अगदी थोडक्यात घेऊ या.

जागतिक लोकसंख्या 790 कोटीच्या घरात पोहोचत असताना जगासमोर अनेक आव्हाने उभी राहत आहेत. हे 4 एफ म्हणजे Food, Fodder, Fiber & Fuel.  नारळ या एकमेव फळात या चारही घटकांसह इतरही अनेक घटक असून ते विविध प्रश्नांसाठी पर्याय म्हणून दडून बसलेले आहेत.

नारळाच्या सर्वांत बाहेरच्या भागाला सोडण म्हणजेच हस्क म्हणतात. त्यापासून उत्तम दर्जाचे फायबर मिळते – काथ्या. काथ्याचे काय काय बनू शकते हे माहीत नसलेला माणूस विरळाच. अत्याधुनिक संशोधनानुसार काथ्यापासून उत्तम दर्जाचे प्लायवुड बनू शकते, जे पाण्याला दाद देणार नाही आणि हे मोल्डिंग फर्निचरमध्येदेखील वापरता येऊ शकेल.

काथ्या काढल्यावर जे उरते त्याला म्हणतात नारळाचा भुसा – कोकोपिट. त्यामध्ये जमिनीच्या 10 पट जास्त पाणी धारण करायची क्षमता आहे. शिवाय अनेक antibacterial आणि antifungal गुणधर्म. त्यामुळे नर्सरी, बीजरोपण, मातिविरहित शेती अशा सर्व ठिकाणी मातीला सर्वोत्तम पर्याय म्हणून कोकोपिटला जगभरात प्रचंड मागणी आहे.

नारळाच्या करवंटीपासून सर्वोत्तम दर्जाचा अ‍ॅक्टिव्हेटेड कार्बन बनतो. शिवाय त्याच्या टणकपणामुळे अनेक मोल्डिंग फर्निचरमध्ये याचा वापर केला जातो.

नारळाचे पाणी खूप औषधी आहे. नारळाच्या पाण्यात आढळणारे इलेक्ट्रोलाइट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे जगात सर्वोत्तम नैसर्गिक स्पोर्टस ड्रिंक बनवतात! युद्धकाळात सैनिकांना सलाइन म्हणून नारळपाणी दिल्याच्या नोंदी आहेत. नारळपाण्यामध्ये प्रचंड Healing आणि  Recovery चे गुणधर्म आहेत.

नारळाचे खोबरे तर बहुगुणी आहे. नारळाच्या खोबर्‍यापासून निघणार्‍या दुधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे. स्तन्य दुधात आढळणारे लॉरिक अ‍ॅसीड मोठ्या प्रमाणात नारळाच्या दुधात आढळते. युरोप, अमेरिकेमध्ये जर्सी गाईच्या दुधाविरुद्धच्या चळवळीत नारळाचे दूध सर्वांत निर्णायक भूमिका बजावते आहे. मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्सचा बॅलन्स असलेले सर्वोत्तम ‘व्हिगन मिल्क’ म्हणून हे जगभर गौरवले जाते. खोबरे आणि दुधाच्या दैनंदिन सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, वार्धक्य लांबते, त्वचा आणि केसांना उत्तम पोषण मिळते, स्नायू बळकट होतात, बुद्धी तेजस्वी राहते!

शरीरांतर्गत विविध त्रास, आजार आणि टॉक्सिन्स यावर थेट परिणाम करून शरीर निरोगी राखून तारुण्य आणि  निरामय आयुष्य प्रदान करणार्‍या नारळाचे महत्त्व जाणून त्या नावाने नारळी पौर्णिमा हे कायमस्वरूपी रिमाइंडर सेट करणार्‍या पूर्वजांची कमाल वाटते. … परंतु दुर्दैवाने इतकी कल्पक योजना केवळ परंपरेचा एक भाग होऊन राहिली आहे. माडावरून नारळ उतरवण्यापासून तो फोडून खोबरे खवण्यापर्यंत अशा अनेक अडचणींमुळे खोबरे आपल्या दैनंदिन आहारातून हद्दपार होत आहे. पूर्वी नारळाच्या पोयांपासून भाज्यांपर्यंत अनिवार्य असलेला हा गोरापान कोवळा छान पदार्थ आता अदृश्य होतो आहे. त्याबरोबरच त्याचे आरोग्यविषयक फायदेदेखील दुर्लक्षित होत राहिले आहेत.

अशाच प्रकारच्या लुप्त होत चाललेल्या आशयघन परंपरांचा मागोवा घेत, त्यातील मुख्य मूल्याचा वेध घेऊन त्याचे पुनरुज्जीवन करण्याचे काम ‘आषाढी व्हेंचर्स’ या मराठमोळ्या स्टार्टअपमध्ये आम्ही करतो. नारळाचे महत्त्व जाणून त्याचे आरोग्यदायक फायदे सहजपणे सर्वांना उपलब्ध व्हावे, यासाठी ‘आषाढी व्हेंचर्स’ने नारळावर दीर्घकाळ संशोधन आणि काम करून ‘अक्षत’ हे नारळाच्या दुधापासून बनवलेले ‘व्हर्जिन कोकोनट ऑइल’ (व्हीसीओ) बनवले आहे. त्यामध्ये असलेले किटोन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स व पॉलिफेनॉनल्सचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. कुठल्याही रासायनिक प्रक्रियेचा आणि उष्णतेचा वापर न करता बनवलेले हे 100 टक्के शुद्ध आणि नैसर्गिक तेल आहे.

अक्षत व्हीसीओ दररोज 2 चमचे मुखावाटे सेवन केल्यास –

(*) वृद्धापकाळात कमी होत जाणारी आंतरिक शक्ती आणि रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी याचा खूप फायदा होतो. वाढत्या वयात होणारे विस्मृती, अल्झायमर आणि पार्किन्सनसारख्या आजारांवर खूपच आश्वासक परिणाम आहेत.

(*) तणावपूर्ण जीवनशैली असणार्‍या क्षेत्रातील (सॉफ्टवेअर, सेल्स, मॅनेजमेंट) व्यक्तींनी व्हीसीओचे दररोज रात्री सेवन केल्यास खूप फायदा होतो.

(*) तान्ह्या मुलांना मसाज करण्यासाठी व्हीसीओ सर्वोत्तम तेल आहे. बहुगुणी लॉरिक अ‍ॅसीड मुलांची प्रकृती सुदृढ घडवण्यास मदत करते.

(*) सांधेदुखीवर व्हीसीओने मसाज केल्यास त्वरित आराम मिळतो.

(*) व्हीसीओने मसाज केल्यास त्वचेला छान आर्द्रता आणि केसांना पोषण मिळते.

चला तर मग, नारळीपौर्णिमेच्या निमित्ताने शरीरातील मरगळ, अनारोग्याचा त्याग करून निरामय आयुष्याचे लेणे धारण करायला बहुगुणी ‘अक्षत’च्या परंपरेची सुरुवात करू या.

‘अक्षत’ व्हीसीओची भारतभरात कुठेही विनामूल्य डिलिव्हरी मिळते.

अवश्य संपर्क साधा.


अधिक माहिती आणि खरेदीसाठी संपर्क –
प्रदीप जोशी, सावंतवाडी
(9422429103)

अनुश्रुती गृहोद्योग, रत्नागिरी 9850893619, 9423292162

आणखी अधिक माहितीसाठी सोबतच्या लिंकवर जा –
https://aashadhi.com/akshat-vco/

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply