रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे १०६ रुग्ण, ६९ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार ६९ रुग्ण करोनामुक्त झाले, तर १०६ नवे करोनाबाधित आढळले. आज दोघांचा मृत्यू नोंदविला गेला. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७२ हजार ५०२ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९५.२६ एवढी आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या १०६ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ७४६ नमुन्यांपैकी ६९७ अहवाल निगेटिव्ह, तर ४९ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या १४५४ पैकी १३९७ अहवाल निगेटिव्ह, तर ५७ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७६ हजार १०७ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ७० हजार ४०७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज १०६६ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ८०२, तर लक्षणे असलेले २६४ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४९५ आहे. त्यापैकी ५६९ जण संस्थात्मक विलगीकरणात असून १९४ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ३०५, डीसीएचसीमधील १२४, तर डीसीएचमध्ये १४० रुग्ण आहेत. बाधितांपैकी १०२ जण ऑक्सिजनवर, ५३ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज दोघा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.९५ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०८ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.१९ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३४५ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या १९६९ (८३.९७ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ८२५ (३५.१५ टक्के) आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३५, दापोली २०९, खेड २१३, गुहागर १६६, चिपळूण ४५७, संगमेश्वर २०२, रत्नागिरी ७८५, लांजा १२३, राजापूर १५५. (एकूण २३४५).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply