रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ७ ऑक्टोबर) करोनाच्या नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. सलग दोन दिवस एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. आज मात्र तिघांच्या मृत्यूची नोंद झाली.
जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार नवे ४५ रुग्ण आढळले, तर ६२ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ३३० झाली असून, ७५ हजार २९० जण बरे होऊन घरी गेले. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.१२ आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ४५ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ८५५ पैकी ८२२ अहवाल निगेटिव्ह, तर ३३ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या १२२२ नमुन्यांपैकी १२१० अहवाल निगेटिव्ह, तर १२ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ७२ हजार २०० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज ६०४ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ३४८, तर लक्षणे असलेले २५६ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ३०७ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात २९७ जण आहेत. आज एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४१, डीसीएचसीमधील ११३, तर डीसीएचमध्ये १४३ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ५७ जण ऑक्सिजनवर, २६ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
यापूर्वीच्या एका आणि आजच्या दोन अशा एकूण तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.३७ टक्के होता. या आठवड्यात तो ३.११ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.३३ आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४३६ झाली आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१८, खेड २२२, गुहागर १६८, चिपळूण ४७५, संगमेश्वर २१३, रत्नागिरी ८१३, लांजा १२६, राजापूर १६२. (एकूण २४३६).
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media