रत्नागिरीत करोनाच्या नवबाधितांपेक्षा नऊपट रुग्ण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ११ ऑक्टोबर) करोनाचे नवे १० रुग्ण आढळले, तर ९३ म्हणजेच नऊपटीहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले. आज चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार नवे १० रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ४८९ झाली असून, ७५ हजार ५८१ जण बरे होऊन घरी गेले. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.३० आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या १० करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ७४५ पैकी ७४० अहवाल निगेटिव्ह, तर ५ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ३३९ नमुन्यांपैकी ३३४ अहवाल निगेटिव्ह, तर ५ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ७९ हजार ३६९ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ४६४ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले २५१, तर लक्षणे असलेले २१३ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या २३६ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात २२८ जण आहेत. आजही एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले १५, डीसीएचसीमधील ९२, तर डीसीएचमध्ये १२१ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ६२ जण ऑक्सिजनवर, २५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

कालच्या दोन आणि आजच्या दोन अशा एकूण चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ४ टक्के होता. या आठवड्यात तो ३.११ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.४३ आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४४४ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१९, खेड २२२, गुहागर १७०, चिपळूण ४७५, संगमेश्वर २१५, रत्नागिरी ८१५, लांजा १२७, राजापूर १६२. (एकूण २४४४).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply