गृहोपयोगी वस्तू खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?

सध्या

डोमेस्टिक अप्लायन्सेस – विशेषतः गीझर, वॉटर प्युरिफायर, इन्व्हर्टर, घरघंटी तसेच शेगडी, मिक्सर, फिल्टर, मॉप, कुकर, कुलर इत्यादी गृहोपयोगी वस्तू खरेदी करताना नक्की कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात?

१. खरोखर आपल्याला नेमक्या कोणत्या वस्तूची गरज आहे? आपला उद्देश या वस्तूच्या खरेदीने साध्य होईल काय? या वस्तूच्या वापरासंदर्भात पूर्ण माहिती मिळणार आहे काय?

२. त्या वस्तूचे इन्स्टॉलेशन वा डेमॉन्स्ट्रेशन करून देण्यात येणार आहे काय?
म्हणजेच ती वस्तू घरी आणून बसवून दिली जाणार आहे का आणि ती कशी चालवायची, याचे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे का?

३. त्या वस्तू सोबत लागणार्‍या अॅक्सेसरीज (सुटे भाग) देण्यात येणार आहेत काय?

४. त्या वस्तूला वॉरंटी मिळणार आहे काय? ती विक्रेता देणार की कंपनी?

५. वस्तूला सर्व्हिस देण्यात येणार आहे काय? ती विक्रेता देणार की कंपनी?

६. वस्तूला वॉरंटी आणि सर्व्हिस विक्रेता देणार असेल तर त्याचे त्याबाबतचे नियोजन कितपत आहे? त्याच्याकडे स्पेअर पार्ट्स आणि मॅन पॉवर आहे काय?

७. त्या वस्तूला वॉरंटी आणि सर्व्हिस कंपनी देणार असेल, तर त्या कंपनीचे आपल्या शहरात कायमस्वरूपी सर्व्हिस सेंटर वा सर्व्हिस इंजिनिअर आहे काय?

८. त्या वस्तूला वॉरंटी ठराविक पार्ट्सना असणार आहे की संपूर्ण वस्तूला?

९. ती वस्तू आपल्या घरातून काढून सर्व्हिस काउंटरवर आणणे एखाद्या वेळी शक्य नसेल (वॉल माऊंटिंग केलेली किंवा अवजड वस्तू), तर जागेवरच येऊन दुरुस्ती आणि इतर सेवा मिळणार काय?

१०. त्या वस्तूचे जे काही बिल, मेमो, चलन, कार्ड असेल त्यावर या सगळ्या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख विक्रेता वा कंपनी करून देणार काय?

११. त्या वस्तूमध्ये संभाव्य बिघाड कोणते? ते कसे टाळता येतील? देखभाल खर्च किती? तो कसा कमी करता येईल?

१२. वॉरंटी आणि त्या काळातील सर्व्हिस संपल्यावरदेखील किमान पुढची तीन चार वर्षे वस्तूमध्ये बिघाड झाल्यास वाजवी आकारणी करून वस्तू दुरुस्त करून मिळणार आहे काय?

१३. लगेच दुसर्‍या वर्षी मॉडेल बंद झाले, सर्व्हिस सेंटर दुसरीकडे गेले , सर्व्हिस इंजिनिअर सोडून गेला, डिस्ट्रिब्युटर बदलला, अशा पळवाटांमुळे वस्तू भंगारात तर टाकावी लागणार नाही ना?

मित्रहो,
फक्त नामांकित कंपनी वा ब्रॅण्डचा स्टिकर किंवा वेष्टन पुरेसे नाही. तसेच एमआरपीवर देण्यात येणारा डिस्काउंट आणि इन्स्टॉलमेंटवरचा झिरो इंटरेस्ट फक्त महत्त्वाचा नाही. याचबरोबर खरेदीपूर्वी थोडीफार उलटतपासणी करणेदेखील आवश्यक आहे. याबाबतीत थोडेसे व्यवहार साक्षर झाले पाहिजे प्रत्येकाने.

©.. मनिष सोल्युशन्स, लांजा
डोमेस्टिक अप्लायन्सेस
एस. व्ही. कुलकर्णी
(बी ई इलेक्ट्रॉनिक्स)
लांजा 416701
(संपर्क : 9970593910)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply