रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ३० रुग्ण, ५७ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १५ ऑक्टोबर) करोनाचे नवे ३० रुग्ण आढळले, तर ५७ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एका रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला.

जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार, आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत नवे ३० रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ६०२ झाली आहे. आज ५७ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत ७५ हजार ८४२ जण बरे होऊन घरी गेले. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.४९ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ६६२ पैकी ६५७ अहवाल निगेटिव्ह, तर ५ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ६५२ नमुन्यांपैकी ६२७ अहवाल निगेटिव्ह, तर २५ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ८५ हजार ७९० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ३०९ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले १९४, तर लक्षणे असलेले ११५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १८८ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात १२१ जण आहेत. आजही एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ६, डीसीएचसीमधील ४७, तर डीसीएचमध्ये ६८ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ४४ जण ऑक्सिजनवर, २५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ४ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१२ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.३२ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४५१ एवढी आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१९, खेड २२३, गुहागर १७२, चिपळूण ४७५, संगमेश्वर २१६, रत्नागिरी ८१७, लांजा १२८, राजापूर १६२. (एकूण २४५१).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply