hands with latex gloves holding a globe with a face mask

रत्नागिरी जिल्ह्यात १५ नवे रुग्ण; २६ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २४ ऑक्टोबर) करोनाचे नवे १५ रुग्ण आढळले, तर २६ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात आज एका करोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या आता २१७ झाली आहे.

जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार, आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत नवे १५ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ८१९ झाली आहे. आज २६ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार १३३ झाली आहे. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.५९ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १०८४ पैकी १०७७ अहवाल निगेटिव्ह, तर ७ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ७२९ नमुन्यांपैकी ७२१ अहवाल निगेटिव्ह, तर ८ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ९९ हजार ६७७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज २१७ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले १२४, तर लक्षणे असलेले ९३ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ११३ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात १०४ जण आहेत. आज एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ११, डीसीएचसीमधील ४३, तर डीसीएचमध्ये ५० रुग्ण आहेत. बाधितांपैकी ४३ जण ऑक्सिजनवर, १८ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ४.८७ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१३ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.४६ आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४६९ आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१९, खेड २२६, गुहागर १७२, चिपळूण ४७६, संगमेश्वर २१८, रत्नागिरी ८२४, लांजा १३०, राजापूर १६५. (एकूण २४६९).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply