सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या २५०पेक्षा कमी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत ६ रुग्ण आढळले, तर ५० जण करोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या २४७ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्याबाहेरील लॅबमधील तीन तपासण्यांसह नवे ६ करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग ०, कणकवली १, कुडाळ १, मालवण १, सावंतवाडी ०, वैभववाडी ०, वेंगुर्ले २.

जिल्ह्यात सध्या २४७ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी १६ रुग्ण ऑक्सिजनवर, तर ८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १२, दोडामार्ग २१, कणकवली ५४, कुडाळ ४७, मालवण ४९, सावंतवाडी ३७, वैभववाडी ६, वेंगुर्ले १८, जिल्ह्याबाहेरील ३.

आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४५१ आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७९, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९७, कुडाळ – २४१, मालवण – २८८, सावंतवाडी – २०२, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – ११०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply