coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात १३ नवे करोनाबाधित; १० जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २ नोव्हेंबर) करोनाचे १३ रुग्ण आढळले, तर १० रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १३१ वर आहे. आज तीन रुग्णांच्या मृत्यू नोंद झाली.

जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार, आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत नवे १३ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७८ हजार ९४७ झाली आहे. आज १० रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ३३८ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.७० आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ५७९ नमुन्यांपैकी ५७० नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर ९ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ५४५ नमुन्यांपैकी ५४१ अहवाल निगेटिव्ह, तर ४ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख १० हजार ३०० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज १३१ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ८६, तर लक्षणे असलेले ४५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ७६ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात ५५ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले १०, डीसीएचसीमधील २०, तर डीसीएचमध्ये २५ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ३१ जण ऑक्सिजनवर, १० रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज दोन, तर पूर्वीच्या एका अशा एकूण ३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर १.८५ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१४ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर १.५३ आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४७८ आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२१, खेड २२७, गुहागर १७२, चिपळूण ४७८, संगमेश्वर २२०, रत्नागिरी ८२६, लांजा १३०, राजापूर १६५. (एकूण २४७८).

एक नोव्हेंबरपर्यंतच्या स्थितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील ९ लाख २१ हजार ७१५ जणांनी करोनाप्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला असून, ३ लाख ९० हजार २६२ जणांनी दोन्ही डोसेस घेतले आहेत. लसीकरण झालेल्यांची एकूण संख्या १३ लाख ११ हजार ९७७ आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply