रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ३ डिसेंबर) करोनाचे नवे २ रुग्ण आढळले, ७ जण बरे होऊन घरी गेले, तर दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. करोनाच्या नव्या प्रकाराचा शिरकाव देशात झाल्याच्या वृत्तानंतर जिल्ह्यातील लसीकरणाच्या प्रमाणात आज वाढ झाल्याचे दिसून आले.
जिल्हा शल्य चिकित्सकांनी करोनाविषयक अहवालात ही माहिती दिली आहे. त्यानुसार आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे केवळ २ नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार १०५ झाली आहे. आज ७ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ५८१ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.८१ झाली आहे. सक्रिय करोनाबाधितांची संख्या ३५ आहे.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ४२४ पैकी ४२३ जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ३६३ नमुन्यांपैकी ३६२ जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर एकाचा पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ३७ हजार १२८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ३५ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले १७, तर लक्षणे असलेले १८ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १७, तर संस्थात्मक विलगीकरणात १८ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १२, तर डीसीएचमध्ये ६ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ७ जण ऑक्सिजनवर, १ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहे.
आज एका आणि काल एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची एकूण संख्या २४८९ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. या आठवड्यात तो ३.१५ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर २.८६ आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४७८, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२९, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४८९).
लसीकरणाची स्थिती
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज (३१ डिसेंबर) लसीकरणाची ८४ सत्रे झाली. त्यामध्ये ३१९८ जणांनी पहिला, तर ८९३३ जणांनी दुसरा डोस घेतला. एकूण १२,१३१ जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १४ लाख ६४ हजार २०७ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी ९ लाख ६५ हजार २०३ जणांनी पहिला, तर ४ लाख ९९ हजार ३ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.