सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडीपाठोपाठ नंतर दोडामार्ग तालुकाही करोनामुक्त झाला आहे. दोन्ही तालुक्यात एकही करोनाबाधित रुग्ण सध्या नाही. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुकासुद्धा करोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. या तालुक्यात फक्त तीन करोनाबाधित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून ते बरे झाल्यास वेंगुर्ले तालुकासुद्धा करोनामुक्त होणार आहे.
आज (११ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात नवे सात करोनाबाधित रुग्ण आढळले. आज कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. आज कोणीही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ३४ असून आतापर्यंत ५१ हजार ७२० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ५३ हजार २१४ रुग्ण बाधित आढळले, तर आतापर्यंत १ हजार ४६० रुग्णांचा मृत्यू झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जिल्ह्यात आज नवे ७ रुग्ण आढळले. त्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग ०, कणकवली ०, कुडाळ ०, मालवण ०, सावंतवाडी ५, वैभववाडी ०, वेंगुर्ले १.
जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या २७ रुग्णांपैकी २ रुग्ण ऑक्सिजनवर, तर दोन रुग्ण चिंताजनक असल्याने व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ६, दोडामार्ग ०, कणकवली ३, कुडाळ ५, मालवण ७, सावंतवाडी १०, वैभववाडी ०, वेंगुर्ले ३, जिल्ह्याबाहेरील ०.
आज एकाही रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नसल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४६० एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४४, कणकवली – २९९, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०४, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड