ययाति आणि देवयानी – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (१७ मार्च २०२२) – ययाति आणि देवयांनी
सादरकर्ती संस्था – खल्वायन, रत्नागिरी

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत साठावी संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी भाग घेतला आहे. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेतील नाट्यप्रयोग सुरू होईल. (स्पर्धेचे प्रयोगपंचांग शेवटी दिले आहे.)

आज १७ मार्च २०२२ रोजी ययाति आणि देवयानी हे नाटक खल्वायन, रत्नागिरी या संस्थेने सादर केले. रत्नागिरीत ११ ऑक्टोबर १९९७ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर स्थापन झालेली खल्वायन ही संगीतविषयक संस्था आहे. करोनाचा काळ वगळता सलग २७५ संगीत मैफली या संस्थेने सादर केल्या. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सायंकाळी या मैफली होतात. स्थानिक तसेच रत्नागिरी जिल्हा, मुंबई, पुणे, गोव्यासह देशभरातील विविध ठिकाणच्या कलाकारांनी आपली कला या मैफलींमध्ये सादर केली आहे. संगीत नाट्य स्पर्धा तसेच संस्कृत नाट्य स्पर्धेतही संस्थेने दिल्लीपर्यंतची वारी केली असून अनेक पुरस्कार मिळविले आहेत.

महाभारतातील ययाती-देवयानी या उपकथानकावर आधारित ययाती आणि देवयानी हे वि. वा. शिरवाडकरांचे नाटक मुख्यतः ययाती-देवयानी आणि शर्मिष्ठा या त्रिकोणातील तीन व्यक्तिरेखांच्या मनोभावांचे चित्रण करते. देवयानी ही शुक्राचार्य या ब्राह्मणाची कन्या. शुक्राचार्यांची संजीवनी विद्या देवयानीला अवगत असल्याने थोडासा गर्विष्ठपणा, अहंकारी स्वभाव तिच्यात निर्माण होतो. ययाती हा क्षत्रीय राजा मद्य व मंचक यांच्या आहारी गेलेला असतो. देवयानी आपल्या मनाप्रमाणे ययातीला वागवू इच्छिते. दानवकुलातील राजा वृषपर्व्यांची मुलगी, एके काळची देवयानीची मैत्रीण आणि दासी शर्मिष्ठा हिच्याबरोबर ययाती विवाह करतो. त्यामुळे देवयानीचा अहंकार दुखावतो आणि ती ययातीला शाप देते. त्यामुळे ययातीला अकाली वृद्धत्व येऊन तो विद्रूप बनतो. देवयानीचा हा अहंकार शुक्राचार्यांचा शिष्य (देवकुळातील बृहस्पतींचा पुत्र) कच दूर करतो. शुक्राचार्यांकडून प्राप्त झालेल्या संजीवनी मंत्राद्वारे कच ययातीला मूळ रूप प्राप्त करुून देतो आणि देवयानीला आपल्या कृत्याचा पश्चाताप होतो. तिच्यातील अहंकार, गर्विष्ठपणा नाहीसा होतो.

या नाटकात हे सुरांनो चंद्र व्हा, प्रेम वरदान, तिमिरातुनी तेजाकडे, सर्वात्मका सर्वेश्वरा अशी एकाहून एक सरस नाट्यपदे आहेत. भाषासौंदर्य, शब्द सौंदर्य आणि शब्दरचना यांचा सुरेख संगम असलेले हे सर्वांग सुंदर नाटक. आहे. उदात्त साहित्यिक सौंदर्याची प्रचीती देणारे मराठी संगीत नाटक परंपरेतील उत्कृष्ट नाटक खल्वायन संस्थेने सादर केले.

श्रेयनामावली :

लेखक : वि. वा. शिरवाडकर
दिग्दर्शक : मनोहर जोशी
मूळ संगीत दिग्दर्शक : पं. जितेंद्र अभिषेकी
संगीत मार्गदर्शन : सौ. स्मिता करंदीकर
ऑर्गन साथ : वरद सोहनी
तबला साथ : प्रथमेश शहाणे
नृत्य दिग्दर्शन : सौ. मिताली भिडे
निर्मितीप्रमुख आणि सूत्रधार : श्रीनिवास जोशी
नेपथ्य आणि रंगभूषा : प्रसाद लोगडे
नेपथ्य साह्य : किशोर नेवरेकर, सुधाकर घाणेकर, संजय लोगडे, सौरभ लोगडे
प्रकाशयोजना : मंगेश लाकडे
प्रकाशयोजना साह्य : श्रवण सनगरे
पार्श्वसंगीत : अनिकेत आपटे, रामदास मोरे
वेशभूषा : सौ. शमिका जोशी
विशेष साह्य : सुयश जोशी
निर्मिती साह्य : संदीप शेट्ये, योगेश सामंत, जयंत यादव, दिलीप केतकर

भूमिका आणि कलावंत :
शर्मिष्ठा : मुक्ता जोशी
देवयानी : प्राजक्ता जोशी
विदूषक : कौस्तुभ जोशी
ययाति : गणेश जोशी
कच : अजिंक्य पोंक्षे
वृद्ध ययाति : ओंकार जोशी
प्रतिहारी : कौस्तुभ सरपोतदार
यति : प्रदीप तेंडुलकर
सेवक : मनोहर जोशी, श्रीनिवास जोशी

स्पर्धेचे वेळापत्रक

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply