रत्नागिरी : जिल्हा शासकीय ग्रंथालयातर्फे महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृती फेरीचे आयोजन येत्या गुरुवारी (दि. २२ सप्टेंबर) रत्नागिरीत करण्यात आले आहे.
भारत सरकारने राजा राम मोहन रॉय यांची २५० वी जयंती देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी एक विस्तृत योजना आखली आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून महिला सक्षमीकरणावर शालेय मुलांची जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे. ही फेरी देशातील २५० जिल्ह्यांमध्ये किमान २५० शाळकरी मुले, प्रामुख्याने मुली, शिक्षक आणि स्थानिक नागरिक यांच्या सहभागाने आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने रत्नागिरीतील शासकीय विभागीय ग्रंथालयामार्फत येत्या गुरुवारी फेरी काढण्यात येणार आहे. या फेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. बी.ए न. पाटील यांच्या सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ फेरीचा समारोप होईल.
या फेरीमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रंथपाल डॉ. विजयकुमार जगताप यांनी केले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media