देवरूख महाविद्यालयाला फाइन आर्ट कलाप्रकारात सहा पारितोषिके

देवरूख : मुंबई विद्यापीठ ५५ व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाने सहा पारितोषिके प्राप्त करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.

फाइन आर्ट (उपयोजित कला) प्रकारात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ४ रौप्य आणि २ उत्तेजनार्थ पारितोषिके मिळविली. या चमकदार कामगिरीच्या जोरावर गत अनेक वर्षांच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. या सर्व सहा पारितोषिकांपैकी फाइन आर्ट कला प्रकारात एक सांघिक रौप्य, तीन वैयक्तिक रौप्य व एक उत्तेजनार्थ तसेच हिंदी कथाकथन प्रकारात एक उत्तेजनार्थ अशी बक्षिसे मिळाली.

बक्षिसांचा तपशील असा – मांडणीशिल्प – सांघिक रौप्य- प्रसाद साळवी, सागर जाधव, सुयोग रहाटे आणि मुस्कान जेठी. रांगोळी-रौप्य-प्रसाद साळवी. पोस्टरमेकिंग-रौप्य- सागर जाधव. कोलाज-उत्तेजनार्थ-प्रसाद साळवी. क्ले मॉडेलिंग-रौप्य-सुयोग रहाटे. हिंदी कथाकथन-उत्तेजनार्थ-सायली महाडिक.

यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सूरज मोहिते, विलास रहाटे, सागर पांचाळ आणि धनंजय दळवी यांनी मार्गदर्शन केले. हिंदी कथाकथन स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. वर्षा फाटक आणि मृण्मयी परांजपे यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा खूप अभिमान वाटतो. कला प्रकारात विद्यार्थ्यांनी यावर्षीही आपल्या यशात सातत्य ठेवले, ही महाविद्यालयाकरीता जमेची बाजू आहे. त्यांचे यश त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या मार्गदर्शकांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाल्याचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सांगितले.

संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष पाठक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा. अजिंक्य नाफडे, प्रा. गायत्री जोशी, प्रा. दिवाकर पाटणकर, प्रा. प्रज्ञा शिंदे, प्रा. प्रथमेश लिंगायत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

देवरूख कॉलेजच्या पारितोषिकप्राप्त कलाकृती

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply