देवरूखमधील पहिली तुकडी अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी रवाना

देवरूख : येथील देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज अग्निवीर प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींची पहिली तुकडी भरती प्रक्रियेसाठी कोल्हापूरला रवाना झाली.

या प्रशिक्षण केंद्राचा प्रारंभ गेल्या २६ सप्टेंबर रोजी झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज अग्निवीर प्रशिक्षण केंद्रात देवरूख परिसरातील माजी सैनिक मैदानी आणि लेखी परीक्षेचे प्रशिक्षण देत आहेत. दररोज सकाळी ७ ते सव्वानऊ या वेळेत नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाते. नियमित प्रशिक्षणार्थींना पौष्टिक आहार संस्थेमार्फत मोफत देण्यात येतो. पौष्टिक आहाराचा नित्य डाएट प्लॅन संस्थेच्या पदाधिकारी नेहा जोशी व ॲड. वेदा प्रभुदेसाई यांनी ठरवला आहे. या प्रशिक्षण वर्गात ८१ मुले-मुलींचा सहभाग आहे.

प्रशिक्षण केंद्रातील पहिली १७ मुलामुलींची तुकडी आणि त्यानंतर ६ मुलींची तुकडी जनरल ड्युटी आणि टेक्निकल पदाच्या भरतीप्रक्रियेसाठी कोल्हापूर येथील टी. ए. बटालियनकडे रवाना होणार असल्याने या प्रशिक्षणार्थींकरिता शुभेच्छा समारंभ झाला. यावेळी माजी सैनिक पुंडलिक पवार, सूर्यकांत पवार, अमर चाळके, पांडुरंग शेंडगे, यशवंत खरात, सुनील जाधव, सुभाष मोरे, महेश सावंत, संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आर्मी अग्निवीर भरतीसाठी जाणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आणि प्रशिक्षण प्रमुख माजी सैनिक अमर चाळके यांनी शुभेच्छा दिल्या. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनीही प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देऊन प्रशिक्षण देणाऱ्या माजी सैनिकांबद्दल आदर व्यक्त केला.

शुभेच्छा समारंभात बोलताना संस्थाध्यक्ष भागवत, प्राचार्य डॉ. तेंडोलकर इतर मान्यवर माजी सैनिक. दुसऱ्या छायाचित्रात शुभेच्छा समारंभाला उपस्थित अग्निवीर प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply