नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या नागपूर-मडगाव आणि परत नागपूर गाडीची येत्या ३ आणि ४ डिसेंबरची एक फेरी रद्द करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या जळगाव यार्डातील दुरुस्तीचे काम सुरू झाले असून ते येत्या ६ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे नागपूर-मडगाव-नागपूर गाडी (क्र. 01139/01140) ही गाडी रद्द करण्यात आली आहे. नागपूर-मडगाव गाडी ३ डिसेंबर रोजी नागपूरहून, तर ४ डिसेंबर रोजी मडगावहून सुटणार होती. मात्र ती रद्द करण्यात आली आहे.
हजरत निजामुद्दिन एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस (गाडी क्र. 12618) नेहमी नाशिक, कसारा, कल्याण मार्गे पनवेलला येते. मात्र ४ डिसेंबर रोजी सुटणारी ही गाडी एका दिवसापुरती बीना, रतलाम, गोध्रा, बडोदा, वसई पनवेल मार्गाने वळविण्यात आली आहे, असे कोकण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड