अतुल्य भारत यात्रेचे गोळवली येथे स्वागत

संगमेश्वर : अतुल्य भारत यात्रेद्वारे आलेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्या सोनी चौरासिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे गोळवली (ता. संगमेश्वर) येथे स्वागत करण्यात आले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, राष्ट्रीय सेविका समिती, भाजपा आणि संघ परिवारातील अन्य संस्थांच्या वतीने गोळवली (ता. संगमेश्वर) येथे परमपूज्य गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्पामध्ये काशी प्रांताच्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्या सोनी चौरसिया आणि त्यांचे सहकारी दाखल झाले. काश्मीर ते कन्याकुमारी अशी अतुल्य भारत यात्रा करण्यासाठी बाहेर पडलेल्या रोलर स्केटर्स सोनी चौरसिया, त्यांचे गुरू आणि त्यांचे २० सहकारी यांचे पथक खेड, चिपळूण असा प्रवास करून संगमेश्वर येथे दाखल झाले. सर्वप्रथम कर्णेश्वर मंदिरात दर्शन घेऊन त्यानंतर संपूर्ण पथक गोळवलकर गुरुजी प्रकल्पामध्ये दाखल झाले. त्या सर्वांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमासाठी अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या सहसचिव नेहाताई जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सोनी चौरसिया यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी यात्रेचा उद्देश आणि प्रवासातले अनुभव कथन केले. यानंतर भाजपाचे हरिभाई पटेल, राष्ट्रीय सेविका समितीच्या नीलाताई, सुनंदा जेरे यांनीही मनोगत व्यक्त करून सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्पाचीही माहिती त्यांना देण्यात आली. नेहाताई जोशी यांनी आभार मानले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply