देवरूख वाचनालयातर्फे लेख, कथालेखन, वक्तृत्व स्पर्धा

देवरूख : येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाने लेख, कथालेखन आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे.

ल. वा. साने गुरुजी स्मृती खुली लेखन स्पर्धा, शालिनी-सदानंद बेंदरकर स्मृती खुली कथालेखन स्पर्धा आणि शांता साने स्मृती खुली वक्तृत्व स्पर्धा अशा या तीन स्पर्धा आहेत.

लेख स्पर्धेसाठी समाजमाध्यमांचा (सोशल मीडिया) जनमानसावरील परिणाम हा विषय असून किमान १२०० ते कमाल १५०० शब्दसंख्या आहे. लेख शक्यतो युनिकोडमध्ये टाइप करून पाठवावा. विजेत्यांना ग्रंथभेट आणि प्रमाणपत्र दिले जाईल.

कथालेखन स्पर्धेसाठी विषय निवडीचे स्वातंत्र्य स्पर्धकाला असून कथेला २००० ते २५०० शब्दमर्यादा आहे. विजेत्यांना ग्रंथभेट आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. कथा शक्यतो युनिकोडमध्ये टाइप करावी. लेख आणि कथा हे साहित्य पाठविण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत आहे. वाचनालयाच्या कार्यालयात प्रत्यक्ष, पोस्टाने, कुरिअरने अथवा वाचनालयाच्या ta6409001@gmail.Com या ई-मेलवर हे साहित्य पाठवावे.

वक्तृत्व स्पर्धा रविवार, ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठीक साडेदहा वाजता वाचनालयाच्या सभागृहात सुरू होणार आहे. स्पर्धकाने समाजमाध्यमांच्या विळख्यात अडकलेली तरुणाई किंवा संस्कारांची विद्यापीठे हरवलीत कुठे? यापैकी एका विषयावर किमान ७ मिनिटे आणि कमाल ९ मिनिटे बोलावयाचे आहे. स्पर्धकांनी आपली नावे प्रा. जी. के. जोशी यांच्या ९४२३२९७३५८ या व्हॉट्स ॲप क्रमांकावर नोंदवावीत. या स्पर्धेसाठी गुणानुक्रमे १,०००, ७५० आणि ५०० रुपयांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

तिन्ही स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी ९४२३२९७३५८ किंवा ७३५०४८२३३६ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply