संगीत नात्यांचे गणित – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र

अंतिम नाटक दि. १७ फेब्रुवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत नात्यांचे गणित हे नाटक पुण्यातील संस्था सादर करणार आहे. कोकणातील एका गणपती बनवणाऱ्या कुटुंबाचे चित्रण नात्यांचे गणित या नाटकात करण्यात आले आहे. हे या स्पर्धेतील अंतिम नाटक आहे.

सादर करणारी संस्था :

संक्रमण, पुणे

काय आहे नाटक?

गणितात नापास होणाऱ्या मुलाचे घरदार ढवळून निघते नि मग सुरुवात होते गणित सोप्या रीतीने शिकवण्याची. यातून कळत जाते की घराघरात गणित आहे. घरात असलेल्या गायिकेचे गाणे पुन्हा सुरू व्हावे, म्हणून कृष्णाने घेतलेला विनायक अवतार यात दाखवला आहे.

संगीत राज्यनाट्य स्पर्धेत या संहितेचा पहिलाच प्रयोग सादर होत आहे. संगीत दिग्दर्शक अभिजित केळकर पहिल्यांदाच या संहितेच्या माध्यमातून संगीत दिग्दर्शन करीत आहेत.

यतिन माझिरे या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक असून तेच यात प्रमुख भूमिकेत आहेत. गेल्या मागील वर्षीच्या म्हणजेच साठाव्या राज्य नाट्य स्पर्धेत यतिन माझिरे यांना त्यांच्या आरंभी स्मरितो पाय तुझे या संहितेसाठी लेखनाचे द्वितीय क्रमांकाचे आणि दिग्दर्शनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.

श्रेयनामावली

नेपथ्य : वैभव नवसकर
प्रकाशयोजना : गिरीश करंदीकर
रंगभूषा : प्रियांका चांदेरे
वेशभूषा : प्रियांका माझिरे
पार्श्वसंगीत : साहिल वाईकर
संगीत दिग्दर्शन : अभिजित केळकर
ऑर्गन : हिमांशु जोशी
तबला : केदार टिकेकर
संवादिनी : आशुतोष जातेगावकर

भूमिका आणि कलावंत

वक्रतुंड : अभिजित केळकर
आप्पा : सुहास संत
विनायक : यतिन माझिरे
शकूकाकू : वेदवती परांजपे
माधव : प्रसाद कुलकर्णी
मनूताई : स्वराली साप्ते
माई : वैशाली कुलकर्णी
गौरी : संतोषी कुलकर्णी
भैरवी : सुरभि कुलकर्णी
बिट्टू : हरक भारतीया
गजाकाका : अनिल कपुरे
श्री : प्रणय गुरव
परश्या : संकेत देशपांडे
राम्या : सुहास देशपांडे
ब्लेयर : गणेश सकपाळ

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply