ताल कथ्थक नृत्यालयाच्या विद्यार्थिनींचे अ. भा. स्पर्धेत सुयश

रत्नागिरी : येथील ताल कथ्थक नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या स्पर्धेत सुयश मिळविले.

पुण्यात अखिल भारतीय सांस्कृतिक संघातर्फे घेण्यात आलेल्या शास्त्रीय नृत्य स्पर्धेत रत्नागिरीतील सौ. सौख्यदा वैशंपायन यांच्या ताल कथ्थक नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रावीण्य मिळविले. त्यात सावनी भोजे, अंतरा रायकर, मनस्वी नांदगावकर, स्पृहा झगडे, श्रेयसी सुर्वे यांच्या गटाला समूह नृत्याचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सामूहिक नृत्यात तीन ताल सादर करण्यात आला, तर ट्रायोच्या मुलींनी तीन ताल आणि तराणा सादर केला.

स्पर्धेत पूर्वा माईणकर, दक्षा आठल्ये, धनिष्ठा खेडेकर यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक, तर सौ. नीला केळकर हिला एकल नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. एकल नृत्य स्पर्धेत तीनताल सादर केला होता.

पुण्यातील जवाहरलाल सांस्कृतिक भवनात ही स्पर्धा झाली.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply