रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी तालुका शाखेतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे ‘श्रावणधारा’ या स्वरचित काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आधुनिक कवितेचे जनक कविवर्य केशवसुत यांच्या या भूमीतून अनेक साहित्यिक उदयास आले. त्यांनी आपल्या साहित्यामधून महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले. त्यांची काव्यपरंपरा कायम जपण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद दरवर्षी ‘श्रावणधारा’ हा स्वरचित काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित करते. त्यानिमित्ताने रत्नागिरी तालुक्यातील ज्येष्ठ आणि नवोदित कवीना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. साहित्य चळवळ अखंड चालू ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो.
श्रावणधारा कार्यक्रम ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असून त्यासाठी पाऊस आणि श्रावण हे दोन विषय देण्यात आले आहेत. कवीने या दोनपैकी कोणत्याही एका विषयावर स्वरचित कविता सादर करायची आहे. सहभागी कवींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. काव्यवाचन युवा गट आणि खुला गट अशा दोन गटांत होणार असून ३५ वर्षांपुढील खुला गट असेल. कार्यक्रम रत्नागिरी तालुका मर्यादित असून सहभागी होणाऱ्या कवींनी आपली कविता, परिचय, गट आणि मोबाइल क्रमांकाची माहिती येत्या ३० जुलैपर्यंत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहभागी होणाऱ्या कवींनी आपल्या कविता दुर्गेश आखाडे (९४२२६३६९५०), आकांशा भुर्के (९४२२४३२६६५), तेजा मुळ्ये (८६६८७४१०८२), चंद्रमोहन देसाई (९७६४७९६६७६) किंवा आनंद शेलार (९१३०७६७१२२) यांच्या व्हॉट्स अॅपवर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

