रत्नागिरी : मुंबईतील दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रत्नागिरीत आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेची प्राथमिक फेरी येत्या २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
खल्वायन संस्थेमार्फत ही स्पर्धा सकाळी ९ वाजता ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहात होईल.
स्पर्धेचे नियम असे – स्पर्धा ज्युनिअर व सिनिअर कॉलेज तसेच इंजिनीरिंग कॉलेज, डीएड, बीएड कॉलेज, लॉं कॉलेज, गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक, आयटीआय इत्यादी तत्सम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आहे. चे विद्यार्थी ह्या स्पर्धेतभाग घेऊ शकतात. आकाशवाणी आणि दूरदर्शन मान्यताप्राप्त कलावंत तसेच स्पर्धेत यापूर्वी प्रथम क्रमांकाचे परितोषिक मिळवणारे विद्यार्थी स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहीत. स्पर्धेत फक्त मराठी किंवा हिन्दी भाषेतील गीत, गझल, भावगीत, भक्तिगीत किंवा अभंग सादर करता येईल. चित्रपटगीतांना तसेच नाट्यसंगीताला परवानगी नाही. प्रत्येक स्पर्धकाला आपले गीत सादर करण्यासाठी पाच मिनिटांचा अवधी दिला जाईल. हार्मोनियम, तबला, तानपुरा इतकीच वाद्ये साथसंगतीसाठी वापरता येतील. साथीदारांची आणि वाद्यांची व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात येईल. तथापि स्पर्धक स्वखर्चाने स्वत:च्या पसंतीचे वादक आणू शकतील. हार्मोनियम आणि तबला या साथीशिवाय स्पर्धेत भाग घेता येणार नाही. गीतांच्या लिखित शब्दांची प्रत समोर ठेवून गाता येणार नाही.
स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेर्यांमध्ये घेण्यात येईल. प्राथमिक स्पर्धेतून निवडलेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात मुंबई येथे २४ डिसेंबर रोजी घेण्यात येईल. प्राथमिक फेरीतील सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि स्पर्धकांवर बंधनकारक राहील. स्पर्धेसाठी १०० रुपये प्रवेश शुल्क आहे.
अधिक माहितीसाठी आणि स्पर्धेसाठी स्पर्धकांच्या सहभागाची नोंद २० ऑक्टोबरपर्यंत श्रीनिवास जोशी (९४०४३३२७०५, ९४२२४७३०८०) यांच्याकडे करावी, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राने केले आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाविद्यालयांना पोस्टाद्वारे किंवा मेलद्वारे पाठविले जाणार आहेत. सर्व महाविद्यालयांनी स्पर्धेकरिता स्पर्धक पाठवून स्पर्धकांच्या कलागुणांना वाव द्यावा, असे आवाहन स्पर्धाप्रमुख रवींद्र आवटी यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

