रत्नागिरी : आजच्या (दि. ६ जानेवारी २०२४) पत्रकार दिनाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषद आणि जिल्हा डिजिटल मीडियाने कुष्ठरुग्ण वसाहतीत सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार परिषद दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविते. या दिवशी स्वतःसाठी काही न करता समाजातील वंचित, दुर्बल घटकांसाठी नेहमी मदतीचा हात देत असते. यावर्षी कुष्ठरुग्ण वसाहतीत जीवनावश्यक किराणा सामान मदत म्हणून देण्यात आले. पत्रकार दिनाला हा सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल तेथील लोकांकडून आभार मानण्यात आले.
यावेळी मराठी पत्रकार परिषद राज्य उपाध्यक्ष जान्हवी पाटील, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर, कार्याध्यक्ष राजेश शेळके, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान, तालुकाध्यक्ष प्रशांत पवार, सचिव व प्रसिद्धीप्रमुख जमीर खलफे, सतीश पालकर, भालचंद्र नाचणकर, रहीम दलाल इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

